पिंपरी : बीआरटी प्रकल्पाच्या पाहणीसाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी अहमदाबाद दौ-यावर गेले. त्यामुळे बुधवारी पालिकेत शुकशुकाट होता. त्यामुळे कामकाजासाठी येणा-या नागरिकांची गैरसोय झाली.पालिकेत सत्तांतर झाल्यानंतरही नगरसेवक, पदाधिकाºयांचे दौरे, सहलीची परंपरा भाजपानेही कायम ठेवली आहे. प्रशिक्षण आणि अभ्यास दौºयांच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरूच आहे. अहमदाबाद येथील बीआरटी प्रकल्प पाहणे आणि नगर नियोजन पाहणे यासाठी बीआरटी दौºयात महापालिकेचे सदस्य आणि अधिकारी असे एकूण १५० जण या दौºयात सहभागी होणार होते. तीन टप्प्यात दौ-याचे नियोजन होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दोनच टप्प्यात दौरा होणार आहे. दौºयाबरोबरच पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे.शिवसेनेने केला विरोधजनतेच्या पैशाने दौरे करण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला होता. आमचे प्रवेश शुल्क घ्या आणि मग आम्ही दौºयात सहभागी होतो, अशी भूमिका गटनेते आणि शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी मांडली होती. त्या प्रशासनाने उत्तर न दिल्याने दौºयात सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. ‘‘दौºयांच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची लूट करणे चुकीचे आहे़ नगरसेवकांच्या मानधनातून दौरा करावा, असेही आम्ही सूचविले होते.’’महापालिका आयुक्त आॅन ड्युटीअहमदाबाद येथील प्रशिक्षणासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर आॅन ड्युटी गेले आहेत. शासनाच्या एका परिपत्रकात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त नसतील प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त काम पाहतील, अशी तरतूद आहे. परंतु, प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे पदभार न देता आॅन ड्युटी आयुक्त अभ्यास दौैºयासाठी गेले आहेत. महापालिका भवनात कामानिमित्त आणि आयुक्तांची भेट घ्यायला आलेल्या नागरिकांची आणि नगरसेवकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे आयुक्त दालनात भेटीविनाच नागरिकांना परतावे लागत होते.महापालिका दौºयात भाजपाचे आमदारदुसºया टप्प्यात महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, बांधकाम परवानाविभागाचे प्रमुखआयुबखान पठाण यांच्यासह भाजपाचे एक आमदाररवाना झाले आहेत.दौºयाच्या कालखंडात स्थायी समिती सभा असल्याने अध्यक्ष सीमा सावळे या दौºयात सहभागीझाल्या नाहीत.
अहमदाबाद दौरा ठरणार वादग्रस्त; महापालिकेत शुकशुकाट, नागरिकांची गैरसोय, कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:01 AM