शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पवनाथडी जत्रा पिंपरी की सांगवीत वाद वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 8:29 PM

जत्रेच्या स्थळाबाबत संदिग्धता

ठळक मुद्देपुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे बारा वर्षांपासून पवनाथडी

पिंपरी : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. याविषयीच्या विषयास महिला आणि बाकल्याण समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. जत्रेच्या स्थळाबाबत संदिग्धता असून ही जत्रा पिंपरीतील एच.ए.ग्राऊंड आणि सांगवीतील पी.डब्ल्यू.डी या दोन मैदान यापैकी कोणत्या ठिकाणी होणार याबाबत उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे जत्रेवरून वाद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे बारा वर्षांपासून पवनाथडी जत्रे भरविण्यास सुरुवात केली. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे तेरावे वर्ष आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा झाली. निर्मला कुटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. या सभेत पवनाथडी जत्रा घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.स्थळावरून होणार वादराष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना काही वर्षे सांगवीतील पीडब्लू डी मैदानावर जत्रा भरत होती. त्यानंतर पदाधिकारी बदलले की या जत्रेचे स्थळ बदण्यात येत होते. काही वर्षे पिंपरीतील एच ए मैदानावरही जत्रा भरविली जात होती. गेल्या दोन वर्षी जत्रेच्या स्थळावरून वाद निर्माण झाला आहे. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्यात येणार आहे. पिंपरीतील एच.ए.ग्राऊंड आणि सांगवीतील पी.डब्ल्यू.डी या दोन मैदानाचे पर्याय सुचविण्यात आले आहेत. सभेत सन २०२० या आर्थिक वर्षात पवनाथडी जत्रा भरविण्याचा ठराव नगरसेविका सुजाता पालांडे आणि निकीता कदम यांनी मांडला होता. त्यात दोन ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे ज्या भागातील महापौर, स्थायी समिती सभापती त्या भागात जत्रा भरविण्यात येते. त्यामुळे यंदा कोणत्या जागेवर जत्रा होणार याबाबत उत्सुकता आहे.स्थायी समितीकडे खर्चाची शिफारसजानेवारी २०२० च्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्यात यावी. तसेच जत्रेच्या आयोजनासाठी केलेल्या तरतुदीमधून, तरतूद कमी पडल्यास आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत इतर योजना कार्यक्रम व तरतुदीतून खर्च करण्यात यावी. यासाठी प्रत्यक्ष येणाºया खर्चास मान्यता देण्यासाठी स्थायी समितीकडे शिफारस केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSangviसांगवी