शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?
2
Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"
3
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
4
त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
6
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे
7
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
8
शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
9
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
10
निकृष्ट दर्जाचे फूड आढळल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार ; पालघरच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लेखी फतवा
11
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
12
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
13
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
14
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
15
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
16
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
17
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
18
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
19
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
20
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

जुन्या-नव्यांचा संगम निर्णायक

By admin | Published: August 09, 2015 3:41 AM

आयटी पंढरी म्हणून सर्वपरिचित असलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांची न झालेली एकजूट अन् सत्ताधाऱ्यांनी बांधलेली

वाकड : आयटी पंढरी म्हणून सर्वपरिचित असलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांची न झालेली एकजूट अन् सत्ताधाऱ्यांनी बांधलेली सर्वपक्षीय नेत्यांची परिपक्व मोट त्यांच्या पथ्थ्यावर पडली. तब्बल १४ जागा जिंकून ग्रामदैवत श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार पुन्हा एकहाती सत्ता ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. सर्वपक्षीय पॅनलने सुशिक्षित यंग स्टार आणि अनुभवी कार्यकर्ते यांचा साधलेला संगमही मतदारांना भावला. त्यातच सत्ताधाऱ्यांनी तयार केलेले हिंजवडीचे व्हिजन डॉक्युमेंट मतदारांसमोर ठेवले. आजवर केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले. आयटीच्या तुलनेने भविष्यात करण्यात येणारे महत्त्वपूर्ण विकासकामे पाणी प्रकल्प, गावाच्या अन्य समस्या, राहिलेली अर्धवट कामे कशी पूर्ण करणार याबाबतही त्यांनी मतदारांना विश्वास दिला.ग्रामपंचायत बिनविरोध करण्याच्या अनेक चर्चा आणि बैठका सुरुवातीला झाल्या. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर विद्यमान सरपंच श्यामराव हुलावळे यांनी स्वत:च्या वॉर्ड क्रमांक ४मधून उमेदवारीचा त्याग करीत एकमेव वॉर्ड क्रमांक ४ संपूर्ण बिनविरोध केला. राष्ट्रवादीचे युवा नेते सुरेश हुलावळे, माजी उपसरपंच मल्हारी साखरे, माजी सरपंच दत्तात्रय साखरे, सरपंच श्यामराव हुलावळे, दिलीप हुलावळे, सूर्यकांत साखरे, प्रदीप साखरे यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलची निवडणूक लढविण्यात आली. विरोधी गटाचा एक, तर या पॅनलचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने १३ जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील ११ जागा जिंकत ग्रामदैवत श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनलने आपला आकडा १४वर नेला. (वार्ताहर)हिंजवडी ग्रामपंचायत : एकूण जागा १७ : प्रभाग एक : जयमाला संभाजी हुलावळे (४७५), नागेश बबन साखरे (४४१), स्मिता संजय जांभूळकर (४५७). प्रभाग दोन -रोहिणी दत्तात्रय साखरे (९५९), रेखा संदीप साखरे (९४७), राहुल अरुण जांभूळकर (बिनविरोध). प्रभाग तीन : प्रवीण दत्तात्रय जांभूळकर (९६६), श्रीकांत दिलीप जाधव (८९२), सीमा कैलास साखरे (८४४). प्रभाग क्रमांक चार : उमेश सूर्यंकात साखरे (बिनविरोध), स्वप्नाली सुभाष साखरे (बिनविरोध), आरती प्रवीण वाघमारे (बिनविरोध). प्रभाग पाच : सागर दत्तात्रय साखरे (५६४).