शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

सत्ताधारी व विरोधकांनी एचबीओटी मशीनवरून प्रशासनाला धरले धारेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:46 PM

महापालिकेच्या पहिल्या सभेत विषय क्रमांक सात एचबीओटी मशीन चालविण्यास देण्याच्या विषयावरून चर्चा झाली.

ठळक मुद्देपहिल्या सभेत विषय क्रमांक सात एचबीओटी मशीन चालविण्यास देण्याच्या विषयावरून चर्चा

पिंपरी : यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील एचबीओटी मशीन चालविण्यास देण्याच्या प्रश्नाच्या चर्चेत महापालिका प्रशासनास सत्ताधारी आणि विरोधकांनी धारेवर धरले. वायसीएममधील अधिष्ठाता निवडीलाही आक्षेप घेतला. महापालिकेच्या पहिल्या सभेत विषय क्रमांक सात एचबीओटी मशीन चालविण्यास देण्याच्या विषयावरून चर्चा झाली. त्यापूर्वीच्या विषयात शिक्षक वर्गीकरणावरून शाब्दिक गोंधळ सुरू असताना सुलक्षणा धर यांनी बोलण्यास सुरुवात केली. मात्र गोंधळामुळे महापौरांनी सांगूनही त्या बोलल्या नाहीत. त्यामुळे सभा तहकूब झाली. दुसऱ्या सभेत एचबीओटीवरून पुन्हा चर्चा झाली. डॉ. पद्माकर पंडित यांच्या निवडीला आक्षेप घेतला. आशा शेंडगे, संदीप वाघेरे यांनी मते व्यक्त केली. शेंडगे यांनी कायदेशीर नियुक्ती आहे का? या नियुक्तीसाठी आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित केला. वायसीएममध्ये दुकानदारी सुरू आहे, असा आरोप संदीप वाघेरे यांनी केला. तर रुपीनगरात ओपीडी नाही, असे पंकज भालेकर म्हणाले. सीमा सावळे यांनी एचबीओटी मशीन कोणाच्या कालखंडात आले. हे सर्वांना माहीत आहे. वायसीएमच्या दोन अधिकाऱ्यांची जबादारी काढून घेऊन डॉ. पद्माकर पंडित यांची नवीन नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती योग्य आहे का ? ज्यांच्याकडे हा विभाग होता. त्यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही. आयुक्तसाहेब विश्वासात घेऊन काम करा. नामदेव ढाके म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला हवे. तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी. काम न करणाऱ्यांना डॉ. पंडित यांनी थेट घरी पाठवावे. आयुक्तांनी डॉ़ पंडित यांना टार्गेट द्यावे, वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू करावे. त्यानंतर हा विषय मंजूर केला. त्या वेळीही राष्ट्रवादीने आक्षेप घेतला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड