पिंपरी : शहरात कोरोना वाढत असताना महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयात एकही रूग्ण आढळलेला नव्हता. गुरुवारी(दि.३०) पहिला रूग्ण सापडला आहे. पुण्यातून एका व्यक्तीचे सासरे चिंचवडला राहायला आले असताना त्यांना कोरोना झाला आहे. तर पिंपळेगुरव मधील एका व्यक्तीस कोरोना झाल्याने पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या ११३ वर पोहोचली आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत पुण्यापेक्षा कोरोना वाढीचा वेग कमी आहे. सामाजिक प्रसार अधिक वाढत असल्याने कंटेन्मेट झोन असलेल्या भागात रूग्ण वाढत आहेत. औद्योगिकनगरीतील कोरोनाच्या रूग्णांत गुरूवारी दोन जणांची भर पडली असून आजपर्यंत एकुण ११३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.शहरात कोरोना वाढत असताना महापालिकेच्या ब प्रभाग म्हणजेच चिंचवड गाव, तानाजीनगर, केशनगर, माणिक कॉलनी, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, किवळे, रावेत या भागात एकही कोरोना रूग्ण सापडला नव्हता. गुरूवारी चिंचवड येथील माणिक कॉलनीत एक रूग्ण सापडला आहे. संबंधित व्यक्ती पुण्याची असून ती चिंचवड येथील मुलीच्या घरी आली होती. दुसरा रूग्ण पिंपळेगुरव जगताप हाईट परिसरात सापडला आहे.
पुण्यातून चिंचवडला राहायला आलेल्या सासऱ्यांमुळे कोरोना पोहचला जावयाच्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 8:55 PM
पिंपळेगुरव मधील एका व्यक्तीस कोरोना झाल्याने पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या ११३ वर पोहोचली.
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत पुण्यापेक्षा कोरोना वाढीचा वेग कमी