पिंपरी - कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाच उपचार करण्याबरोबरच लसीकरणावर भर दिला जाणार असून विविध कंपन्यांच्या मदतीने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केले आहे. ८९ लसीकरण केंद्रे, दीडशेपर्यंत नेण्यात येणार आहेत. शुक्रवारपासून झोपडपट्यांमधील ४५ वषार्पुढील नागरिकांना लस देण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.कोरोना परिस्थितीचा आढावा आयुक्तांनी घेतला. उपाययोजनाबाबत माहिती दिली.टाटा मोटर्स कंपनीत आजपासून लसीकरण सुरु केले आहे. त्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले आहे. लसीकरणासाठी पाच लोकांची आवश्यकता असते. महापालिका केवळ एकच कर्मचारी देते. कारखान्याचे चार कर्मचारी घेतात. तसेच मोठ्या कंपन्या, शाळा, आस्थापनांमध्येही लसीकरण केले जाणार आहे.’’ झोपडपटटी वासियांनाही लसीकरणआयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘‘ महापालिकेकडे कोरोना लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत. लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न आहे. शहरात ७१ झोडपट्या आहेत. त्यामध्ये सुमारे तीन लाख लोकसंख्या आहे. महापालिका उद्यापासून झोपडपट्यातील ४५वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करणार आहे. २० खासगी शालेय बसच्या माध्यमातून झोपडपट्टीतील नागरिकांना लसीकरण केंद्रावर घेवून जाण्यात येणार आहे. झोपडपट्टीच्या जवळील केंद्रावर नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. बसचे डिझेल आणि वाहनचालकाचा जेवण खर्च महापालिका करणार आहे. लसीकरणासाठी स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे.’’ जम्बोतील वातानुकुलीत यंत्रणा दुरूस्तीची सूचनाजम्बो रुग्णालय मंगळवारपासून सुरू केले आहे. यात पन्नास रुग्ण आहे. तेथील वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली होती. याबाबत आयुक्तांकडे तक्रार आल्यानंतर राजेश पाटील यांनी दुरूस्ती तातडीने करण्याची सूचना केली. सायंकाळपर्यंत ही यंत्रणा सुरळीत झाली होती.
सल्याचे, आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. तसेच टाटा मोटर्सच्या सहाय्याने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.