पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असला तरी, शनिवारी दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेले रुग्ण जास्त आहेत. दिवसभरात १,१४४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १,१६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७,६६० झाली. शनिवारी दिवसभरात महापालिका हद्दीबाहेरील ९६ नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३,९९७ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १,९६१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरात शनिवारी दिवसभरात १४ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील चार जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८६२ तर महापालिका हद्दीबाहेरील १८२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच ३३८७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ४०४९ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५७५६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ८६६ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ३३,२७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह २८७ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.शहरात शनिवारी मृत झालेल्या रुग्णांमध्ये चिखली येथील ४८ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय पुरुष, पिंपरी येथील ६४ वर्षीय महिला, पिंपळे गुरव येथील ८० वर्षीय महिला, खराळवाडी येथील ७० वर्षीय महिला, ७२ वर्षीय पुरुष, निगडी येथील ७८ वर्षीय पुरुष, भोसरी येथील ८८ वर्षीय पुरुष, ८० वर्षीय पुरुष, अहमदनगर येथील ४१ वर्षीय पुरूष, चाकण येथील ३३ वर्षीय पुरुष, येलवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष, बालेवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
.......
सव्वालाख रुग्णांचा अहवाल निगेटिव्हशहरात आजपर्यंत १,७६,६३३ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. तर १६४०६२ रुग्णांना आजपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १२,८५५८६ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरात आजपर्यंत एकूण ३३,२७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.