पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, मंगळवारी दिवसभरात ८५७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४३,३७४ झाली. दिवसभरात ११५८ जण कोरोनामुक्त झाले. तर ३७७७ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात २५६९ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात मंगळवारी दिवसभरात २३ जण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील तीन जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८२५ तर महापालिका हद्दीबाहेरील १६९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. कोरोना चाचणी केलेल्या २१५९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ६१२३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६१२३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६६१ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १६८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील २९७३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह १४१ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.