पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी दिवसभरामध्ये शहर परिसरामध्ये ८५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १ हजार ३१८ जण पूर्ण मुक्त झाले आहे. कोरोनामुळे शहरातील २३ जणांचा बळी गेला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संशयितांची तपासणी यांवर भर दिल्याने मागील आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या दिवसाला पंधराशेपर्यंत पोहोचली होती, आता ही संख्या पाच दिवसांपासून कमी होत असताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरामध्ये शहरात ८५६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरातील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आज ३ हजार ९०९ जणांना दाखल करण्यात आले होते. पुण्यातील एन आयव्हीकडे पाठवलेल्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी ३ हजार ४३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १ हजार २५६ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर दिवसभरामध्ये ४ हजार ३७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयांत रुग्णांची संख्या ४ हजार ९७२ झाली आहे. ..... कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले शहर परिसरामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजपर्यंत शहर परिसरातील ६० हजार ७७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील २३ आणि शहराबाहेरील २६ अशा एकूण ४९ जणांचा कोरोना ने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक असून त्याचा विळखा ज्येष्ठांना बसत असल्याचे दिसून येत आहे.१३१८ जण