पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसभरात ९२२ रुग्ण आढळले असून, ४४८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरातील २० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गुरुवारी १ हजार ३५८ जणांना डिस्चार्ज दिला आहे.१४५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात १ हजार ७९७ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १४५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ३२ हजार ५६५ वर पोहोचली आहे. तर १ हजार ४५४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. १३५७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार ८५३ झाली आहे.
प्रतीक्षेत अहवाल १२३७ दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. १२३७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ४४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २२ हजार ४५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. २० जणांचा बळी, पुरुषांची संख्या अधिक शहरातील १३ आणि शहराबाहेरील ७ अशा एकुण २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची, पुरुषांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ५३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.