पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. कोरोनाचा शिरकाव झोपडपट्टयांबरोबरच उच्चभ्रू आणि दाट लोकवस्तीच्या परिसरातही कोरोना वाढत आहे. दिवसभरात सतरा रूग्ण सापडले असून त्यात सात रूग्ण हे शहरातील आणि उर्वरित दहा रूग्ण हे पुण्यातील आहेत. आजअखेर २३३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे आज दिवसभरात दोघांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत कोरोनाचा वेग वाढला आहे. शहरातील झोपडपट्ट्यांतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसेच दाट लोकवस्तीच्या भागातही कोरोना वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा रिपोर्ट आज आला असून, त्यात १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. भोसरी, रूपीनगर, आनंदनगर आणि चिंचवडस्टेशन या भागात सात रूग्ण तर शिवाजीनगर, येरवडा, पुणे कॅन्टोन्मेंट, आंबेगाव, बीड परिसरातील अन्य रूग्ण असून सर्व रूग्ण महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर आज मृत्यू झालेले दोघे भोसरी परिसरातील असून एका स्त्रीचे वय चाळीस तर पुरूषाचे वय ७८ वर्ष आहे.
Corona virus : पिंपरीत मंगळवारी सापडले १७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:40 AM
आजअखेर २३३ जणांना कोरोनाची बाधा
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत कोरोनाचा वाढला वेग