पिंपरी : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आनंदनगर, थेरगाव, बौद्धनगर, बजाज ऑटो कॉलनी, किवळे परिसरातील १६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील रुग्णांची संख्या ४५९ वर पोहोचली आहे. तर पुण्यातील एका व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला असून, शहरातील बळीची संख्या अठरावर गेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची वाढ होत होती. ती आज कमी झाली आहे. गुरुवारी १६ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ४५९ वर पोहचली आहे. २२७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील २८ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील ३५ रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आजपर्यंत १९७ जण कोरोनामुक्त झाले असून, पुण्यातील अकरा आणि पिंपरी-चिंचवडमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे.२४२ जणांचे अहवाल प्रलंबितपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात ११३ जणांना दाखल केले आहे. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांची संख्या ५०९ झाली आहे. तर आज ६४ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ७१ जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ७ पुरुष, ६ महिला आणि पुण्यातील ३ पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये किवळे, आनंदनगर, बौद्धनगर आणि पुण्यातील नागरिकांचा समावेश आहे. तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यात आनंदनगर, चिंचवड या भागातील नागरिकांचा समावेश आहे.
गोखलेनगर येथील व्यक्तीचा मृत्यूकोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या पुण्यातील गोखलेनगर येथील व्यक्तीस पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, कोरोनाने १८ वा बळी घेतला आहे. बळींमध्ये पुण्यातील अकरा तर पिंपरीतील सात जणांचा समावेश आहे.