शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी ३१ नवीन कोरोनाबधित रुग्णांची नोंद, देहूरोड येथील वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 8:29 PM

पिंपरीतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८४ वर पोहचली..

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून दिवसभरात ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर देहूरोड येथील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ५८४ वर गेली आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून शहरात आज दिवसभरात एकूण ३१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये २५ पुरूष तर १० महिला आणि पुण्यातील ४ पुरूष, २ महिलांचा समावेश आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर, वाकड, दापोडी, रामनगर, चिंचवड, पिंपरी, अजंठानगर, किवळे, पिंपळे सौदागर, मोरवाडी, पिंपळे गुरव, खडकी, आंबेगाव, कसबा पेठ, बालेवाडी येथील नागरिकांचा समावेश आहे.महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज १०३ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या २६ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच १८९ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये २८५ जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये वाकड, चिंचवड, फुगेवाडी, रहाटणी, पिंपळे सौगदार, रावेत, वाल्हेकरवाडी, आनंदनगर, ताथवडे आणि बीड येथील नागरिकांचा समावेश आहे.कोरोनामुळे देहूरोड येथील ७० वर्षीय व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. या व्यक्तीस पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकर