पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, शनिवारी दिवसभरात ८६९ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२,५१७ झाली. दिवसभरात ६१८ जण कोरोनामुक्त झाले. तर ३७६२ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३५२६ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात शनिवारी दिवसभरात २६ जण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील नऊ जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ७९४ तर महापालिका हद्दीबाहेरील १६६ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. कोरोना चाचणी केलेल्या १८१८ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३५३७ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६७२३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६३२ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील २८,५७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह १३३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.