शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

Corona virus : पिंपरीतील 'रेड झोन'मधील सीमा झाल्या 'असुरक्षित'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:07 AM

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सीमा रस्त्यांवरील सुरक्षितता झाली ढिली.

ठळक मुद्देपुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील कोरोनावाढीचा आलेख राहिला कमीविविध रस्त्यांवरील चेक नाक्यांची पाहणी केल्यानंतर सीमा असुरक्षित झाल्याचे समोर वाढता लॉकडाऊन पोलिसांना त्रासदायक पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज

विश्वास मोरे-पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सीमा बंद केल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा आणि पासधारकांना ये-जा करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सीमा रस्त्यांवरील सुरक्षितता ढिली झाली आहे. आवो-जाओ घर तुम्हारा...अशी परिस्थिती असून वाकड, हिंजवडी, देहूरोड, आळंदी, निगडी परिसरातील सीमा असुरक्षित असल्याचे 'लोकमत'च्या टीमने केलेल्या ' ऑन द स्पॉट ' पाहणीत आढळून आले.महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पिंपरी-चिंचवड शहरात ४ मार्चला पहिले तीन रुग्ण आढळले. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी कडक उपाययोजना केल्या. वेळीच उपाययोजना केल्याने गेले दोन महिने पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील कोरोनावाढीचा आलेख कमी राहिला आहे.

मात्र, तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये सुरक्षा यंत्रणा ढिली झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर रेडझोनमध्ये येते. तसेच शहरात २१ कंटेन्मेट झोन केल्याने या शहरातून विनापरवाना बाहेर जाण्यास आणि येण्यास मनाई आहे. शहराच्या सीमा नाक्यांवर गेल्या महिन्यांत कडक तपासणी करण्यात येत होती. मात्र, सध्या 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत शहराच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था ढिली झाल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळेत शहरात येणाऱ्या विविध रस्त्यांवरील चेक नाक्यांची पाहणी केल्यानंतर सीमा असुरक्षित झाल्याचे वास्तव समोर आले.

शहरातून पुणे-मुंबई जुना महामार्ग, द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळुरू महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग असे रस्ते जातात. नाशिक महामार्गावर मोशीत, आळंदीतून शहरात येण्यासाठी आळंदी, देहू फाटा, चाकण एमआयडीसीतून आणि देहूगावातून तळवडे फाट्यावर तसेच पुणे-मुंबई राष्ट्रीय महामागार्ने निगडी भक्ती-शक्ती चौक, द्रुतगती महामार्गाने किवळेत, सांगुडीर्तून किवळेत, नेरेतून पुनावळेत, हिंजवडीतून भूमकर चौकात, वाकड चौकात, बालेवाडीतून वाकडमध्ये, ज्युपीटर हॉस्पिटलकडून पिंपळे निलखमध्ये, औंधमधून सांगवीत, बोपोडीतून दापोडीत आणि विश्रांतवाडीतून दिघीत येण्यासाठी सीमा रस्ते आहेत.

विनापरवाना नागरिकांची ये-जा : वाढता लॉकडाऊन पोलिसांना त्रासदायक1 - कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी- चिंचवड महापालिकेचे, पोलीस विभागाचे, राज्य व केंद्रीय विभागांचे कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना आदेशानुसार वगळले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, परवानगी किंवा पासशिवाय शहराच्या सीमेवरून आत आणि बाहेर जात येत नाही. मात्र, नागरिक दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन सीमांवरून ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. रावेत परिसरात सुमारे पंचवीस तरुण बॅगा घेऊन चालल्याचे दिसून आले. त्यांना हटकले असता देहूरोडकडून आलो आहे, असे त्यांनी सांगितले. मग या तरुणांना शहराच्या सीमेवर का अडविले नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो.2 - वाढता लॉकडाऊन पोलीस यंत्रणेसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. पोलीसही कोरोनाचे शिकार ठरू लागले आहेत. तर दुपारी पारा चाळीस अंशावर पोहोचत असल्याने त्यांना नाक्यावर उभे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. प्रतिबंधित क्षेत्राशिवाय अन्य शहरात भाजीपाला आणि किराणा माल, दूध दुकानांना सवलत दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात पोलीस प्रशासन यशस्वी ठरले आहे.

केवळ प्रतिबंधित क्षेत्रात होतेय कडक अंमलबजावणीपिंपरी : महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य क्षेत्रातही सर्व प्रकारचे दवाखाने, रुग्णालये, क्लिनिक, प्रसूतिगृहे व औषधी दुकाने यांनाही वगळण्यात आले आहे. ती संपूर्ण कालावधीकरिता खुली केली आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीतच दूध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री यांची कडक अंमलबजावणी होत आहे.शहरातील २१ कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरित भागात भाजीपाला व फळे विक्रीही सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत निश्चित केलेल्या जागांवरच सुरु राहील. उर्वरित कालावधीमध्ये विक्रीस प्रतिबंध राहील. घरपोच भाजीपाला व फळे विक्री ही मनपाच्या पूर्व मान्यतेनुसारच करण्यात येईल.प्रतिबंधित क्षेत्रात मटण व चिकन दुकानांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच कंटेन्मेंट वगळून सवलत देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे, औषधांचे व तयार अन्न पदार्थांचे घरपोच वाटप सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीतच पास घेऊन सुरू आहेत.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसshravan hardikarश्रावण हर्डिकर