पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच शनिवारी दिवसभरात शंभरापेक्षा कमी संख्येने नवे रुग्ण आढळून आले. शनिवारी ९७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८,६७८ झाली. तर दिवसभरात १६१ जण कोरोनामुक्त झाले. १८७८ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १८६० जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात शनिवारी दिवसभरात महापालिका हद्दीतील चार रुग्ण दगावले. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १,५४४ तर महापालिका हद्दीबाहेरील ६३९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच ७५७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १,९४२ जणांना घरी सोडण्यात आले. तर ७९० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील १६७ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ६,५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ८५३७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ४०९ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
रुग्णसंख्या घटल्याने यंत्रणेवरील ताण कमीशहरात दिवसाला हजारावर रुग्ण आढळत होते. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण होता. मात्र काही दिवसांपासून ही संख्या हजाराच्या आत आली. तर शनिवारी शंभरापेक्षा कमी संख्येने रुग्ण आढळले. त्यामळे शहरातील यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.