पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून मंगळवारी दिवसभरात ३४२ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच महापालिका हद्दीबाहेरील १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२०३ वर गेली. तर दिवसभरात २३२ जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात १३६० संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले.
शहरात मंगळवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्येने शंभरी पार केली असून आजपर्यंत १०४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात महापालिका हद्दीतील ७२ तर महापालिका हद्दीबाहेरील ३२ जणांचा समावेश आहे. एनआयव्हीकडे पाठविलेल्या ११९४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला. तसेच १९३७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून दिवसभरात १२७० जणांना घरी सोडण्यात आले. तर २४९२ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. मंगळवारी मृत झालेल्या रुग्णांमध्ये बौध्दनगर पिंपरी येथील ६४ वर्षीय पुरुष, शरदनगर चिखली येथील ८५ वर्षीय पुरुष, चिंचवड येथील ८४ वषीर्रु पुरुष, सुखवाणी पिंपरी येथील ६७ वर्षीय पुरुष, मिलिंदनगर पिंपरी येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ११६ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील २३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ३१३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह असलेले १३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.