शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

Corona virus : पिंपरीत कोरोनामुळे सहावा बळी; शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 6:19 PM

दिवसभरात दहा आठ नवीन रूग्ण सापडले

ठळक मुद्देतरूण लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना

पिंपरी :औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसभरात दहा आठ नवीन रूग्ण सापडले आहेत. कोरोनाने सहावा बळी घेतला असून मृत महिला ही पुण्यातील शिवाजीनगरची आहे. नवीन रूग्णांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ गेली आहे. आजपर्यंत १४२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील आठ आणि पुण्यातील दोन जणांचा समावेश आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पुण्यापेक्षा पिंपरीत कोरोनाचा वेग काहीसा कमी आहे. शहरातील २१ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून शहराचा नव्वद टक्के भाग कंटेन्मेट मुक्त झाला असून केवळ दहा टक्के क्षेत्रात कंटन्मेंट झोन आहे.मंगळवारी २०५  रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहेत. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल बुधवारी  सकाळी आले असून त्यात दहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सात पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ७१ असून त्यातील १० रूग्ण पुण्याबाहेरील दहा  असून महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये परंतु शहराबाहेरील रूग्णालयात आठ जण उपचार घेत आहे. महापालिका परिसरातील रूग्ण पिंपरीतील वायसीएम रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार घेत आहे.  तसेच शहरातील ६० आणि पुण्यातील दोन असे एकुण ६२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.बुधवारी पॉझिटिव्ह आलेले आठ रूग्ण शहरातील असून मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड येथील रहिवाशी आहेत. तर दोन रूग्ण पुण्यातील आहेत. त्यात सात पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुरूषांमध्ये एकाचे वय ६ वर्षे  दुसºयाचे वय २१, तिसºयाचे वय २२, चौथ्याचे वय २४, पाचव्याचे वय २८ वर्ष, सहाव्याचे ३०, सातव्याचे ५० वर्षे आहेत. तर महिलांमध्ये एकीचे वय २५, दुसरीचे वय २८ वर्षे आहे.शिवाजीनगर येथील एक महिला पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेत होती. तिचा मृत्यू बुधवारी झाला आहे. कोरोनामुळे शहरातील तीन आणि शहराबाहेरील तीन अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर