पिंपरी : औद्योगिकनगरीतील कोरोनाच्या रूग्णांत चार जणांची भर पडली असून आजपर्यंत एकुण १११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार घेणाऱ्या खडकीतील एका पन्नास वर्षीय महिलेचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एकुण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत पुण्यापेक्षा कोरोना वाढीचा वेग कमी आहे. सामाजिक प्रसार अधिक वाढत असल्याने कंटेन्मेट झोन असलेल्या भागात रूग्ण वाढत आहेत. बुधवारी सकाळी चार रूग्णांची भर पडली आहे. कोरोना बाधित सक्रिय रुग्णांचा आकडा ९६ वर पोहचला आहे. तर आजपर्यंत १११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात बारा पुरूष आणि नऊ महिलेचा समावेश आहे.देहूरोड आणि पुण्यातील रूग्णांचा समावेशमहापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, महापालिकेच्या भोसरीतील रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. आज रूग्णालयात १५३ संशयित रूग्णांना दाखल केले आहे. तर ३५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर १६६ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. हे अहवाल प्रतिक्षेत आहेत.सकारात्मक अहवाल आलेले रूग्ण थेरगाव, रूपीनगर, देहूरोड, पुण्यातील रविवार पेठ येथील आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये चार पुरूषांचा समावेश आहे. त्यात एकाचे वय १ वर्षे, दुसऱ्याचे वय ९ वर्षे, तिसऱ्याचे वय १९ वर्षे, चौथ्या रूग्णाचे वय ३० वर्षे आहे. कोरामुळे मृत्यू झालेली महिला ही खडकी येथील रहिवाशी असून तिचे वय पन्नास वर्षे आहे. तर आजपर्यंत कोरानामुक्त ३१ जण झाले आहेत. ...................
चार जण कोरोनामुक्त......कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण येण्याचे प्रमाण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात भोसरी आणि खराळवाडी येथील राहणाऱ्या चार जणांच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात आजपर्यंत एकुण ३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी कोरोमुक्त झालेल्या आणखी चौदा दिवस घरीच रहावे लागणार आहे.