पिंपरी : इंग्लंडहूनपिंपरी-चिंचवडमध्ये परतलेल्या २६८ प्रवाशांचा शोध लागला असून यातील १४ प्रवासी भारतात परतले नसल्याचे समोर आले आहे. ५० प्रवासी बाहेरगावी गेले असून १६ जणांचा २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. उर्वरित १८८ जणांची कोरोना चाचणी केली. त्यातील १५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर २३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत असून, आजपर्यंत सहा जणांचे अहवाल पाॅझिटव्ह आले आहेत. शहरात गुरुवारी दिवसभरात चार रुग्ण दगावले.
शहरात गुरुवारी १२५ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६६०८ झाली. तर दिवसभरात ६० जण कोरोनामुक्त झाले. २,०५१ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १,८०४ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १,७५६ तर महापालिका हद्दीबाहेरील ७३१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. गुरुवारी दिवसभरात १,५११ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १,९८५ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६३२ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६४ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७,३९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९३,३६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ४३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.