पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्ण होण्याची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी दिवसभरामध्ये महापालिका परिसरामध्ये ७६४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ८२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहर परिसरातील बारा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमातून शहर परिसरातील संशयित नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती, दिवसाला बाराशे ते दीड हजार रुग्ण आढळून येते होते. आता ही संख्या कमी होऊ लागला आहे. एक हजाराच्या आत रुग्ण आढळून येत आहेत. .................... १ हजार 0१ जणांचे अहवाल निगेटिव्ह महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आज दिवसभरामध्ये २ हजार ९९०जणांना दाखल करण्यात आले असून पुण्यातील एन आयव्हीकडे पाठविलेल्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी १ हजार 0१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ९८८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरामध्ये २ हजार ९४७ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............. रुग्णालयात दाखल असणाऱ्यांची संख्या ४ हजार ५६१ झाली आहे. दिवसभरामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमधून ८२७ जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६९ हजार ८८८ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ हजार ८१ वर पोहोचली आहे.
..........
बारा जणांचा बळी रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक तरी वेळेवर उपचार न घेतल्याने मृतांचे प्रमाण वाढू लागले आहे. शहर परिसरातील १२ आणि शहराबाहेरील ५ अशा १७ जणांचा बळी घेतला असून बळीमध्ये ज्येष्ठ व ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आजपर्यंत १ हजार ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.