पिंपरी : पुण्यातील भवानी पेठेतील राहणाऱ्या आणि पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ५७ वर्षांच्या व्यक्तीचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन महिन्यांत मृतांची संख्या नऊवर गेली आहे.पुण्यातील भवानी पेठेतील रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकास दिनांक ८ मे रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाव्यतिरिक्त उच्च रक्तदाबाचाही त्रास होता.आजपर्यंत पुण्यातील पाच आणि शहरातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिनांक १२ एप्रिलला थेरगाव भागातील एका पुरुषाचा, २० एप्रिलला निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि २४ एप्रिलला निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, २९ एप्रिलला खडकीतील एका महिलेचा, सहा मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात, भोसरीतील पुरुष रुग्णाचा ११ मे रोजी आणि पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष अशा नऊ जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.
Corona virus : पिंपरीत कोरोनाचा नववा बळी; भवानी पेठेतील रुग्णाचा वायसीएममध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:27 PM
आजपर्यंत पुण्यातील पाच आणि शहरातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
ठळक मुद्देकोरोनाव्यतिरिक्त उच्च रक्तदाबाचाही त्रास