पाच हजाराचा दंड वसूलपिंपरी : कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या शहर परिसरातील २१ रुग्णालयांना नोटीस दिली असून ५ हजारांचा दंड केला आहे. तसेच १ कोटी ४० लाखांची बिले नागरिकांना परत केली आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. कोरोनाच्या कालखंडामध्ये राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना उपचार विषयक दराबाबत नियमावली जारी केली होती. कोरोनाच्या कालखंडामध्ये खाजगी हॉस्पिटलकडून लूट होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यासाठी दहा सदस्यीय समिती नियुक्त केली होती या समितीने गेल्या महिनाभर मध्ये तक्रारी आलेल्या रुग्णालयाची पाहणी केली तसेच बिलांची तपासणी केली. त्यानुसार रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे...........
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोनाच्या कालखंडामध्ये रुग्णांवरील उपचारासाठी राज्य शासनाने नियमावली जारी केली होती. त्यानुसार रुग्णालयांनी दर आकारणी करणे अपेक्षित होते. मात्र काही रुग्णालय अवाजवी पद्धतीने रक्कम वसूल करत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार या तक्रारींची तपासणी करण्यासाठी आम्ही समिती नेमली होती. या समितीच्या माध्यमातून तक्रारी आलेल्या तक्रारी नसलेल्या रुग्णालयांची तपासणी केली त्यामध्ये २१ हॉस्पिटल दोषी आढळले असून त्यांना सुरुवातीला नोटीस देण्यात आली. त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक हॉस्पिटलला पाच हजार रुपये दंड देण्यात लावला आहे. विविध रुग्णालायतील १ कोटी ४९ लाख बिलांची रक्कम परत मिळवून दिली आहे. रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर तसेच बिलांची तपासणी केल्यानंतर २१ रुग्णालय दोषी धरण्यात आले.''..................माहिती न देणार्यांनाही दंड
श्रावण हर्डीकर म्हणाले ''रुग्णालयांनी कोरोनाच्या कालखंडात महापालिकेकडे उपलब्ध बेडची माहिती अद्यावत करणे गरजेचे आहे, मात्र याबाबत काही रुग्णालय माहिती वेळेवर अपडेट करत नसल्याचे आढळून आले. त्यांना नोटीस देऊन दंड केला आहे.