पिंपरी : कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पिंपळे सौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील पाच जणांचे गुरुवारी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय मुंबईतील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकाचे अशा सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या २४५ वर गेली आहे. कोरोनामुळे आजपर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाचा सामाजिक प्रसार सुरू आहे. वैद्यकीय विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये वय वर्षे २५, ३२, ३५ वर्षीय पुरुष आणि २९, ६५ वर्षीय दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईतील रहिवासी मात्र, वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३२ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तर, मोशी, जुनी सांगवी, चिखली येथील चार जण गुरूवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडले आहे....................शहरातील सात जणांचा मृत्यूमहापालिका रुग्णालयात ८० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील २४५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील १६ बाधित रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील सात आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणा-या नऊ अशा सोळा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Corona virus : पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी परिसर केला सील; पाच जणांचे रिपोर्ट 'पॉझिटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 5:19 PM
पिंपरीतील कोरोना बाधितांची संख्या २४५ वर; आजपर्यंत सोळा जणांचा मृत्यू
ठळक मुद्दे मोशी, जुनी सांगवी, चिखली येथील चार जण गुरूवारी कोरोनामुक्त