पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ‘कंटेन्मेंट झोन’मध्येही वाढ झाली. कंटेन्मेंट झोनची संख्या २१ वरून १०७ झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत लॉकडाऊन शिथिल केले. त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र, कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडले. त्यामुळे ह्यकंटेन्मेंट झोनह्णमध्येही वाढ झाली. या क्षेत्रातील निर्बंध कडक केले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात आठ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एप्रिलमध्ये आठ दिवस संपूर्ण शहर प्रतिबंधिक क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यानंतर रुग्णवाढीचा दर कमी झाल्याने सक्रिय रुग्ण असलेली २१ ठिकाणेच 'कंटेन्मेंट झोन' जाहीर केली. त्यानंतर शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय प्रभागांच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले. त्यामुळे 'कंटेन्मेंट झोन'मध्ये वाढ झाली.----------असे आहेत मतदारसंघनिहाय कंटेन्मेंट झोन...भोसरी विधानसभा :
राधाकृष्णनगर, साई अपार्टमेंट, गुरुविहार, खंडोबा माळ, बालाजीनगर, गीता सोसायटी, गवळीनगर, संत तुकारामनगर, चिखलीतील यशवंतनगर, पाटीलनगर, मोरेवस्ती, रेजेंट पार्क, गोकुळ सीएचएस, ओम साई सीएचएस, इमन झेका पार्क, क्रियस्टल सिटी, निगडीतील महात्मा फुले सोसायटी,साईकृपा सीएचएस, साईनाथनगर, निगडी-रुपीनगरमधील कौतय सीएचएस, पंचदुर्गा सीएचएस, त्रिवेणीनगर, अजंठानगरमधील सिद्धार्थ बिल्डिंग, यशोदा सीएचएस, थरमॅक्स चौक, चऱ्होलीतील तनिष्क ऑर्चेड, काटेनगर, फुलेनगर, वडमुखवाडी, दिघीतील बीयू भंडारी, बोपखेलमधील छत्रपती चौक.