शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

Corona Virus : पिंपरीत 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर खासगी रुग्णालयांना मिळणार 'प्लाझ्मा' बॅग्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 10:56 AM

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचे देशात अनेक ठिकाणी दिसून आले आहे..

ठळक मुद्दे२०० एमएलसाठी ५००० रुपये आकारणार

तेजस टवलारकरपिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला २०० एमएलची एक प्लाझ्मा बॅग तयार करण्यासाठी ५००० रुपये खर्च लागत आहे. १०० एमएलची बॅग तयार करण्यासाठी २५०० रुपये खर्च लागत आहे. त्यामुळे 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर खासगी रुग्णालयांकडून अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय 'वायसीएम'ने घेतला आहे. खासगी रुग्णालयांना २०० एमएलसाठी ५००० रुपये, १०० एमएलसाठी २५०० रुपये असे दर ठरविण्यात आले आहेत. वायसीएमला जेवढा खर्च बॅग तयार करण्यासाठी येतो, तेवढेच पैसे खासगी रुग्णालयांकडून घेण्यात येणार आहे. वायसीएम आणि रुबी एलकेअरमधील रुग्णांना प्लाझ्मा बॅग मोफत देण्यात येणार आहेत. वायसीएमच्या रक्तपेढीत ४ ऑगस्टपर्यंत ७८ दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यातून एकूण १७६ प्लाझ्मा बॅग्ज तयार करण्यात आल्या आहेत. यातील १३६ बॅग्ज वायसीएम व रुबी एलकेअरमधील रुग्णांना मोफत देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील खासगी रुग्णालयातील रुग्णांना ४० बॅग्ज मोफत देण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. रुग्णवाढीत मध्यम आणि तीव्र आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचे देशात अनेक ठिकाणी दिसून आले आहे. शहरातील बऱ्याच रुग्णांना प्लाझ्मा थेरपीमुळे फायदा झाला आहे. त्यामुळे प्लाझ्मा बॅग्जची मागणी सध्या वाढली आहे. 

वायसीएम रुग्णालय हे कोरोनाच्या उपचारासाठी समर्पित करण्यात आले आहे. कोरोनाच्या उपचारासाठी समर्पित सर्व शासकीय रुग्णालय, महानगरपालिकेचे रुग्णालय, खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांना राज्य शासनाने प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर