पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील ७८३, पुण्यातील ९ अशा ७९२ कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ३० हजार ६१९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ५९० कोरोनामुक्त झाले आहे. तर १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात आज २०५० जणांना दाखल केले असून त्यापैकी २२५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे आहेत. तर १७१६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरात आजपर्यंत ३० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज सहाशे जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्या २२ हजारांवर पोहोचली आहे. शहरातील ५१० जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ११७ अशा ६२७ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात ५३१३ सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत..................
चौदा जणांचा बळीकोरोनामुळे शहरात १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये निगडी (पुरुष ७२ वर्षे), भोसरी (स्त्री ८० वर्षे), दिघी (पुरुष २४ वर्षे, पुरुष ५२ वर्षे), पिंपरी (पुरुष ६३ वर्षे), दापोडी (पुरुष ८० वर्षे), मोरवाडी ( पुरुष ७० वर्षे), वाकड (पुरुष ६० वर्षे), चिंचवड (पुरुष ४७ वर्षे), पिंपळेनिलख (स्त्री ८०वर्षे), पुनावळे (पुरुष ३४ वर्षे) तसेच पुणे पालिका हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण निगडी (स्त्री ५५वर्षे), भोसरी (स्त्री ४० वर्षे, स्त्री ५४ वर्षे) समावेश आहे.