पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून शुक्रवारी तीन रूग्ण आढळून आले आहेत. चोविस तासात शहरात सहा रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकुण रूग्णांची संख्या २७ वर गेली आहे. मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती असून त्यात एक महिला, पुरूष आणि त्यांची छोटी मुलगीचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. गुरूवारी एक पुरूष आणि एक महिला असे रूग्ण वाढले होते. त्यानंतर चोविस तासातच शुक्रवारी सायंकाळपर्यंत आणखी तीन रूग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी ३३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज मिळाले आहेत. त्यात तीन जणांचा समावेश आहे. मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती असून त्यात एक महिला, पुरूष आणि त्यांची छोटी मुलगीचा समावेश आहे. पुरूष हा ५५ वर्षांचा तर महिला ४५ वर्षांची आहे. आज रूग्णालयात ७४ जणांना दाखल केले आहे. तसेच ५४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. चोविस तासात रूग्णांची संख्या सहाने वाढली आहे. त्यामुळे एकुण रूग्णांची संख्या २७ झाली आहे. तर एकुण दाखल रूग्णांपैकी १२ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच आज ३४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही......................................मरकज कार्यक्रमातील नागरिकांवर लक्षपिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढण्यास दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या नागरिकांच्या सहवासात आलेल्यांचाही महापालिका प्रशासन शोध घेत आहे. गेल्या आठवडा भरात दाखल झालेल्या एकुण पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये मरकज कार्यक्रमातील सहभागी झालेल्या नागरिकांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या सहवासात आलेल्या नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.