शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Corona Virus : पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्या ७० हजारांच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 10:54 AM

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९,४२३ झाली.

ठळक मुद्देशनिवारी दिवसभरात ९८४ नवे रुग्ण : ९०३ जण झाले कोरोनामुक्त     

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, रुग्ण संख्या ७० हजारांच्या उंबरठ्यावर आहे. शनिवारी दिवसभरात ९८४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९,४२३ झाली. महापालिका हद्दीबाहेरील तीन नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात ९०३ जण कोरोनामुक्त झाले. तर ४११३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३२२९ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.शहरात शनिवारी दिवसभरात ५२ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील २७ जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ११३४ तर महापालिका हद्दीबाहेरील ३६२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच १९६२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ४०३२ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५४४४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ११५३ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ३७८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ५४४३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ४६५ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.

चिंता वाढली...शहरातील रुग्ण संख्या सप्टेंबरमध्ये ५० ते ६० हजारांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्यापेक्षा १० हजार जास्त रुग्ण आतापर्यंत अर्थात ७० हजारांपर्यंत रुग्ण आढळून आले आहेत. या महिन्यातील आणखी १० दिवसांत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन व नागरिकांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकर