पिंपरी : महापालिका परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत शंभरने कमी झाली आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात २ हजार ११३ रुग्ण सापडले असून १ हजार १६१जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पंधरा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ३ हजार ५१० जणांना डिस्चार्ज दिला आहे. अहवालांची प्रतिक्षा वाढली आहे. २ हजार ०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. (Awaits reports in Pimpri-Chinchwad, 2113 positive, death toll rises)
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २२०० पर्यंत वाढलेली रुग्णसंख्या शंभरने कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ४ हजार ४६४ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ९९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३ हजार ३६० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ३ हजार ५१० जणांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ४८३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार २५१ वर गेली आहे. पंधरा जणांचा बळीकोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या आज वाढली आहे. शहरातील १५ आणि शहराबाहेरील २ अशा एकूण १७ जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील १० पुरूष आणि ५महिलांचा समावेश आहे. त्यात ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ०१८ वर पोहोचली आहे. ४२५० नागरिकांना लसीकरण्कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी अधिक होत आहे. शहरातील महापालिकेच्या ११ आणि खासगी ३९ अशा एकूण ५० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात ३ हजार ३५२ जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार २८५ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ३५ हजार ५६१ वर पोहोचली आहे.