पिंपरी : कोरोना रुग्णवाढीचा आलेख कालपेक्षा चारशेंनी वाढला आहे. २९८२ जण पॉझिटिव्ह आढळले असून २ हजार ७५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बळींमध्ये २० ते ७० या वयोगटातील संख्या वाढत आहे.
महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २५०० वर आलेली रुग्णसंख्या आज चारशेंनी वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ११जार ६७४ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ११ हजार ६७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ हजार ८८८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ७ हजार ५२१ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ११ हजार ४२६ जणांना डिस्चार्ज दिला आहे.............................कोरोनामुक्त कमी झाले शंभरने कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा दोनशेंनी कमी जण कोरोनामुक्त झाले आहेत. २ हजार ७५६ जण कोरोनामुक्त एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ५६ हजार ३३६ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार ९१६ वर गेली आहे...................................३२ जणांचा बळीकोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या कालच्या एवढीच आहे. शहरातील ३२ आणि शहराबाहेरील २२ अशा एकूण ५४ जणांचा बळी घेतला आहे. त्यात तरुण आणि महिलांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. बळींमध्ये २० ते ७० या वयोगटातील संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ३४९ वर पोहोचली आहे...............लसीकरण घटलेकोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वाढलेला वेग कमी झाला आहे. महापालिकेच्या ६२ आणि खासगी २२ अशा एकुण ८४ लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिकेतील केंद्रावर ७ हजार ५०९ तर खासगी रुग्णालयात १०११ अशा एकूण ८ हजार २२० जणांचे लसीकरण करण्यात आले तर ४५ वर्षांवरील ९८६ जणांना लस देण्यात आली आहे.