शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 3:33 PM

दुबईला गेलेल्या चाळीस प्रवाशांपैकी शहरातील तिघांचा समावेश

ठळक मुद्देपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली माहिती वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड परिसरात आढळलेला पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. दुबईला गेलेल्या चाळीस प्रवाशांपैकी शहरातील तिघांचा समावेश आहे. संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.चीनमध्ये कोरोना व्हायरसने दहशत माजविली असतानाच हा व्हायरस आता  भारतात दाखल झाला आहे. कोरोनाने महाराष्ट्रातील पुण्यातही शिरकाव केला आहे. पुण्यात 8 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, पिंपरी-चिंचवड पाच संशयितांपैकी तीन  रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन असा संवाद सुरू आहे. 

महापालिका सज्ज, खासगी रूग्णांलयांनाही सूचना  कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला असून वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलशन बेड उपलब्ध केले आहे.  आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका सक्षमपणे तयार आहे.  नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. महापालिका हद्दीत आपत्ती व्यस्थापन सज्ज झाला आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये कोरोना विषाणूची माहिती देण्यासाठी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, सर्व प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांची समन्वय म्हणून नियुक्ती केली आहे.ह्णह्णवैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, एका खासगी ट्रॅव्हल कंपनीतर्फे पुण्यातून दुबईला प्रवाशी फिरायला गेले होते. त्यात पिंपरी-चिंचवडमधील तीन प्रवाशांचा समावेश होता. त्यापैकी तीन प्रवाशी आहेत. संबंधित टॅ्व्हल कंपनीबरोबर गेलेल्या प्रवाशांना शोधून त्यांच्याकडून आरोग्यबाबत माहिती घेण्यात येत आहे. संततुकारामनगर येथील वायसीएममध्ये दाखल केल्या गेलेल्या पाच जणांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलDubaiदुबई