पिंपरी : महापालिकेतील महिला व बाल कल्याण समितीचे सात सदस्य सिंगापूर दौºयास रवाना झाले आहेत. एका ठेकेदाराच्या मदतीने ही टूर आयोजित केली असल्याची चर्चा महापालिका वतुर्ळात रंगली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांचाही या टूरमध्ये सहभाग आहे.पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार सुरू झाल्यानंतर या प्रथा बंद होतील, असे शहरवासीयांना वाटत होते. मात्र, सहलींच्या नावाखाली नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरूच आहे. सहलींना महापालिकेतील सत्ताधाºयांचा पाठिंबा आहे. दरम्यान, ‘दौºयांवर जा परंतु अहवाल द्या, असे धोरण स्थायी समितीने आखले आहे. त्यामुळे सहली होणारच आहेत. त्यामुळे महापालिकेच्या खर्चाऐवजी ठेकेदारांच्या खर्चाने जाण्याची युक्ती लढविली जात आहे.महापौर काळजे हे नोव्हेंबर महिन्यात स्पेनच्या दौºयावर रवाना होणार आहेत. त्या पाठोपाठ महिला व बाल कल्याण समितीच्या नऊ नगरसेवकांनीही अभ्यास दौºयाचा हट्ट धरला. प्रारंभी, हैदराबाद दौºयाचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर महाबळेश्वरची निवड केली. त्यात तिसºयांदा बदल करून केरळ निश्चित करण्यात आले. या दौºयासाठी येणाºया खर्चास स्थायीने मंजुरीही दिली. दरम्यान, सिंगापूर दौºयातही सत्ताधाºयांसह विरोधी पक्षांतील सदस्य आहेत. त्यामुळे सत्ताधाºयांबरोबरच विरोधकांचीही अळीमिळी गुपचिळी दिसून येत आहे.
ठेकेदाराच्या मदतीने नगरसेवक सिंगापूरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 6:46 AM