पिंपरी : साठ वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला की स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकांचे शिफारस पत्र हे प्रथा परंपरेनुसार चालते, याबाबत कोणतेही कायदेशीर तरतूद केलेली नाही, असे उत्तर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांना दिले आहे.नगरसेवकांच्या शिफारसपत्राचा दुरूपयोग होऊ नये, त्यामुळे साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नगरसेवकाच्या पत्राबरोबरच डॉक्टराच्या तज्ज्ञ समितीचे पत्र घेऊनच स्मशान दाखला देण्यात यावा, अशी सूचना प्रशासनास केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील एखाद्या व्यक्तीस कोणत्याही वैद्यकीय उपचार न करता नैसर्गिकरित्या मृत्यू आल्यास किंवा त्या व्यक्तीचे वय हे साठपेक्षा अधिक असल्यास नागरिकांना स्मशान दाखला देण्यासाठी नगरसेवकांचे शिफारसपत्र ग्राह्य धरले जाते. त्या शिफारसपत्रावरून महापालिकेकडील दवाखाना, रूग्णालयाकडून अंत्यविधीसाठी स्मशानपास देण्यात येतो. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी महापालिका प्रशासनास पत्र देऊन माहिती विचारली होती. स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकाकडून शिफारसपत्र देण्याविषयीची कायदेशीर तरतूद काय? याबाबत कोणत्या नियमानुसार स्मशान दाखल्यासाठी पत्र दिले जाते, अशी विचारणा केली होती. त्यावर महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी पत्र दिले आहे. ..........................स्मशान दाखला देण्याबाबत शिफारस पत्र हे रूढी आणि पूर्वपरंपरेनुसार दिले जाते. शिफारस पत्र देण्याबाबत कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही. तसेच महापालिका सभा, स्थायी समिती किंंवा कोणत्याही सक्षम समितीचा ठराव उपलब्ध नाही. त्यामुळे स्मशनदाखला दे्यापूर्वी अथवा देताना मृत व्यक्तीच्या मृत्यू कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, फॉर्म चार व चार अ या नमुन्यामध्ये अथवा डॉक्टरांचा पोस्टमोर्टेम अहवाल घेऊन स्मशान पास देण्यास हरकत नाही.-डॉ. पवन साळवे, (आरोग्य वैद्यकीय अधिकारी) .................साठ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर नगरसेवकांच्या शिफारस पत्राने स्मशान दाखल देण्यात येतो. मात्र, मृत्यूवरून कौटुंबिक काही वाद झाला. काही अडचण आल्यास शिफारस देणारा नगरसेवक चुकीची माहितीमुळे अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे नगरसेवकाच्या शिफारसपत्राबरोबर डॉक्टरांच्या समितीचा अहवाल घेऊन स्मशान दाखला दिल्यास नगरसेवकांना कोणतही कायदेशीर अडचण येणार नाही. याबाबतची सूचना प्रशासनास केली आहे. -विलास मडिगेरी, (अध्यक्ष, स्थायी समिती महापालिका).
स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकाचे पत्र रूढीपरंपरेनुसार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 4:27 PM
स्मशान दाखला देण्याबाबत शिफारस पत्र हे रूढी आणि पूर्वपरंपरेनुसार दिले जाते...
ठळक मुद्देडॉक्टराच्या तज्ज्ञ समितीचे पत्र घेऊनच स्मशान दाखला देण्यात यावा, अशी सूचना प्रशासनास