पिंपरी : वाहनचोरीचे गुन्हे वाढत असतानाच वाहन चोरांनी नगरसेवकाची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दापोडी येथे ४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तसेच चिंचवड व चांदेनांदे फाटा, माणगाव येथून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.
नगरसेवक राजू विश्वनाथ बनसोडे (वय ४०, रा. सीएमई गेट समोर, जाधव चाळ, दापोडी) यांनी बुधवारी (दि. ९) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगसेवक बनसोडे यांनी त्यांची दुचाकी पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई गेटसमोरील जनसंपर्क कार्यालयासमोर ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनला पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक उघडून ती चोरून नेली.दुसºया प्रकरणात राजकुमार श्रीमंत केंगार (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी घराजवळ सोमवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीची ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार मंगळवारी (दि. ८) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला.तिसºया प्रकरणात विकास नारायण शिंदे (वय ३२, रा. चांदेनांदे फाटा, माणगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी मंगळवारी (दि. ८) रात्री आठच्या सुमारास त्यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घरासमोर हँडेल लॉक न करता पार्क केली होती. २० हजार रुपये किमतीची ती दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. बुधवारी (दि. ९) सकाळी सहाच्या सुमारास दुचाकी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.