लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : शिव विचार जागर अभियान, शिवशाही संघटना व मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभाग सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले सिंहगडावर शिवशौर्य कार्यक्रम घेण्यात आला़ त्यात ८ ते १४ वयोगटातील दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी शिवशाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमित थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी सचिन मांगडे, विजय मुजुमले, प्रतीक वऱ्हाडी व शीतल वऱ्हाडी, मुख्याध्यापिका प्रमिला जाधव, स्वाती जाधव, राजश्री ढोरे आदी उपस्थित होते. तर या शिबिराची सांगता मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी डॉ. सचिन जगताप, डॉ. अनिल पाटील, हनुमंतराव जाधव, संतोष थोपटे, प्रा. भारती किर्दक, निना ढोरे, हृषीकेश शेलार, मुकेश चव्हाण, प्रा. क्षितिज कदम, विश्वजित पाटील, गणेश आडागळे, माधव मोरे, ऋतिक उदावंत, ऋतिक पेंदे, माउली ढवळे, शुभम चौगुले, शुभम काटे उपस्थित होते. पहिल्या दिवशी गडबड गप्पा-आजीचा कप्पा, ‘मी शिवबा होणार’ याचे सादरीकरण झाले.
विद्यार्थ्यांना दिले शौर्याचे धडे
By admin | Published: May 12, 2017 5:02 AM