पिंपळे गुरव : जुनी सांगवीतील गॅस शवदाहिनी आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मृत नातेवाइकांची वणवण सुरू आहे.याबाबत मनसेचे शहर सचिव राजू सावळे यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना लेखी निवेदन दिले आहे. भूमिगत केबल ब्रेक झाल्याने पर्यावरण मनपा विभागाला संपर्क साधून महावितरणकडे तक्रार केली. महावितरणशी संपर्क साधला असता, मनपाने नवीन केबल टाकून घ्यावी, असे सांगितले. यामध्ये ठेकेदार नामानिराळा असून, नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. यामुळे आठ दिवसांत नऊ मृतदेह पुणे मनपाकडे अंत्यविधीसाठी पाठविण्याची वेळ आली आहे. पिंपरी-चिंचवड मनपा फक्त टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे. ठेकेदाराला देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असताना देखील काम होत नाही. मनपा कारवाई करायला धजावत नाही. नागरिकांनी कोणाकडे जायचे हा मोठा प्रश्नच आहे? शवदाहिनीसमोर तांत्रिक बिघाडामुळे शवदाहिनी बंद असल्याचा फलक लावला आहे. तरी महापालिकेने कारवाई करावी. (वार्ताहर)
सांगवीतील शवदाहिनी बंद
By admin | Published: April 29, 2017 4:07 AM