पिंपरी : रेशनिंग कार्ड काढून देते, असे सांगून महिला एजंटने एक हजार रुपये घेतले. त्यानंतर बोगस रेशनिंग कार्ड बनवून देऊन फसवणूक केली. निगडी येथील परिमंडळ अधिकारी अ विभाग येथे जुलै 2019 मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी 40 वर्षीय एजंट महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आशा झुंबर गाडेकर (वय 50, रा. वाकड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गाडेकर यांना रेशनिंग कार्ड बनवून पाहिजे होते. त्यासाठी निगडी येथे परिमंडळ अधिकारी अ विभाग या कार्यालयात त्या आल्या. तेथे कार्यालयाबाहेर आरोपी एजंटने त्यांना गाठले. रेशनिंग कार्ड बनवून देते, असे सांगून गाडेकर यांच्याकडून एक हजार रुपये घेतले. त्यानंतर बोगस रेशनिंग कार्ड देऊन फियार्दी गाडेकर यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.