शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

भाजपाच्या चार नगरसेवकांवर गुन्हे ; निवडणुकीतील भयमुक्तचे आश्वासन हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 5:57 AM

‘भय, भ्रष्टाचारमुक्त कारभार’ असे आश्वासन देऊन फेब्रुवारी २०१७च्या महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज केलेल्या भाजपाच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या सत्ताकाळात चार नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले.

पिंपरी : ‘भय, भ्रष्टाचारमुक्त कारभार’ असे आश्वासन देऊन फेब्रुवारी २०१७च्या महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज केलेल्या भाजपाच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या सत्ताकाळात चार नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले. यामध्ये काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी घालणारे आहेत.महापालिकेतील भाजपाचे क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे यांच्यावर सोमवारी हाणामारी आणि दुकानाच्या तोडफोडीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. ‘भ्रष्टाचारमुक्त व भयमुक्त शहर’ असे नागरिकांना आश्वासन देऊन भाजपाने महापालिका निवडणुकीत बाजी मारली. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तालय गरजेचे असल्याने त्याबाबत पाठपुरावा झाला. पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागूनही लोकप्रतिनिधींकडून गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये घडत आहेत. लोकप्रतिनिधींचा गुन्हेगारी घटनांत वाढता सहभाग ही चिंतेची बाब बनली आहे. अन्यथा पोलीस आयुक्तालय होऊनही शहरवासीयांना भयमुक्त जीवन जगणे अशक्य असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.लोकप्रतिनिधींवरील गुन्हे चिंताजनकक्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, संत तुकारामनगर प्रभागाच्या नगरसेविका सुजाता पालांडे, संभाजीनगर प्रभागाचे नगरसेवक तुषार हिंगे, विशालनगर (वाकड) येथील नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हिंगे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटे वस्ती येथून भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले नगरसेवक तुषार कामठे यांच्याविरोधात सांगवी ठाण्यात बनावट आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. टपरीचालकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संत तुकारामनगर (पिंपरी) येथील नगरसेविका सुजाता पालांडे यांच्याविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपा