पिंपरी : नाकाबंदीदरम्यान महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकासह एका शिपायावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जूनला पहाटे तीनच्या सुमारास बावधनमधील चांदणी चौकात घडला.पोलीस निरीक्षक संदीपान सावंत आणि शिपाई पुंजरवाड अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही कोथरूड वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : १ जूनला रात्री सावंत व त्यांचे सहकारी चांदणी चौकात नाकाबंदी करीत होते. दरम्यान, पीडित महिला व त्यांचे नातेवाईक मोटारीतून चौकात आले असता दरम्यान, पीडित महिला त्या ठिकाणी आली व नातेवाइकाच्या पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्याबाबत आणि त्यांची चूक असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे केली. पुंजरवाड यांनी पीडित महिलेच्या नातेवाइकासोबत झटापट केली. (प्रतिनिधी)
विनयभंगप्रकरणी निरीक्षकावर गुन्हा
By admin | Published: June 09, 2015 5:40 AM