लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : एमआयडीसी, भोसरी येथील एस ब्लॉकमधील माया इंजिनिरिंग वर्क्स या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम पगारातून कपात केली. मात्र भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली नाही. ही बाब निदर्शनास आल्यामुळे अमरजीतसिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.भोसरी डब्ल्यू १३०, एस ब्लॉक एमआयडीसी, भोसरी येथे माया इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. आरोपी अमरजीत सिंग यांनी कामगारांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात केली. मात्र, ती रीतसर भविष्य निर्वाहनिधी कार्यालयात मुदतीत जमा केली नाही. ३ लाख १५ हजार १७७ रुपये कामगारांच्या वेतनातून कपात केलेली ही रक्कम वेळेत कार्यालयात भरणे अपेिक्षत होते. कामगारांच्या पीएफ खात्यावर भरणा करण्याच्या रकमेचा अपहार केला. त्यामुळे गोळीबार मैदान पुणे येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात प्रवर्तन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या माधुरी घाटपांडे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अमरजीतसिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भविष्य निर्वाह निधी न भरणाऱ्यावर गुन्हा
By admin | Published: May 11, 2017 4:43 AM