भोसरी : दवाखाना उघडून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, डॉ. मेमन अमिन करी व जावरमियॉ महमद मियॉ शेख (वय ३४, रा. पारशी चाळ, देहूरोड) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मेमन व जावरमियॉ शेख हे दापोडी येथे आयुर्वेदिक दवाखाना उघडून व्यवसाय करीत होते. कुठलीही शैक्षणिक पात्रता नसताना या दोघांनी दवाखाना उघडून बोगस व्यवसाय सुरू केला होता. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री देवीदास शेलार यांनी याबाबत तपासणी केली असता, हे दोघेही बोगस आयुर्वेदिक दवाखाना उघडून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघांवर गुन्हे
By admin | Published: March 16, 2016 8:36 AM