पिंपरी : ‘लोकमत’ने अवैध धंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुन्हे शाखेतील कर्मचारी आता आयुक्तांच्या नजरकैदेत राहणार आहेत, म्हणजेच त्यांच्या नियुक्त्या मुख्यालयात असणार आहेत. फक्त दहा कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. तसेच अनेक उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यालयातील काही अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मुख्यालयात असणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या मर्जीमुळे स्वतंत्र पोलीस ठाणे मिळाल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेतून बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव (कंसात कोठून कोठे) : संपत निकम (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), दादाभाऊ पवार (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), तुषार शेटे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), मंहमद नदाफ (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), नितीन बहिरट (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), चेतन मुंढे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), महादेव जावळे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), प्रमोद वेताळ (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), प्रमोद हिरळकर (गुन्हे शाखा युनिट ते मुख्यालय), सुनील चौधरी (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), के. आर. आरुटे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), प्रवीण दळे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), हजरतअली पठाण (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय).बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांचे नाव (कंसात कोठून कोठे) : सुधीर अर्जुन चव्हाण (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे), गणेश जयसिंग धामणे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस ठाणे), आर. एम. गिरी (दिघी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), अविनाश एकनाथ पवार (नियंत्रण कक्ष ते वाकड पोलीस ठाणे), विजय पांडुरंग गरुड (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे), प्रमोद क्षीरसागर (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी).....बदली झालेल्या पोलीस उप निरीक्षकांचे नाव (कंसात कोठून कोठे) : रमेश केंगार (निवडणूक कक्ष ते हिंजवडी पोलीस ठाणे), ईश्वर धुराजी जगदाळे (देहूरोड ते भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे), मकसुद मणेर (चाकण ते वाकड पोलीस ठाणे), प्रसाद दळवी (सपोआ वाकड- वाचक ते रावेत चौकी), वैभव हनुमंत सोनवणे (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते शिरगाव चौकी), संदीप शांताराम गाडीलकर (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते शिरगाव चौकी), डी. जे. नागरगोजे (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते शिरगाव चौकी), प्रमोद क्षीरसगार (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), व्ही. डी. सपकाळ (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), एस. एस. सूर्यवंशी (चाकण पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), आर. एस. भदाणे (चाकण पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), डी. के. दळवी (चाकण पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), किशोर अमृत यादव (चिंचवड वाहतूक विभाग ते देहूरोड वाहतूक विभाग), सुधाकर निवृत्ती धेंडे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा), एस. एस. कैलासे (नियंत्रण कक्ष ते सपोआ गुन्हे- १ यांच्याकडे संलग्न)रवींद्र दादासाहेब जाधव (सांगवी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), प्रकाश गणपत धस (देहूरोड पोलीस ठाणे ते पोलीस कल्याण शाखा), उमेश औदुंबर तावसकर (वाहतूक नियंत्रण कक्ष ते सांगवी वाहतूक विभाग), अजय हनुमंत भोसले (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस ठाणे- गुन्हे), प्रसाद शंकर गोकुळे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक नियोजन, प्रशासन- वाहतूक शाखा), गणेश साहेबराव जवादवाड (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे- गुन्हे), शैलेश सुधाकर गायकवाड (नियंत्रण कक्ष ते अतिक्रमण)
गुन्हे शाखेचे कर्मचारी राहणार पोलीस आयुक्तांच्या ‘नजरकैदेत’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 1:26 PM
फक्त दहा कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
ठळक मुद्देबदल्यांचे आदेश : अवैध धंद्यांचा पर्दाफाश केल्यानंतर अनेक अधिकाºयांची मुख्यालयात बदली