शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पिंपरीतील उद्योजकावर ६२ लाखांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 7:17 PM

कंपनीसाठी साहित्य खरेदी करून पैसे न दिल्याचे प्रकरण

पिंपरी : कंपनीसाठी माल खरेदी करून त्याचे पैसे न देता उद्योजकाने त्याच्या कंपनीचे स्थलांतर करून घेतले. तसेच खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता एकूण ६२ लाख १६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली. खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी येथील वासुली तसेच कुरुळी येथे २० जुलै २०१९ ते १४ डिसेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी उद्योजकाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेमा भाऊसाहेब गलांडे (वय ३७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ७) फिर्याद दिली. त्यानुसार विपूल कासार वजरीनकर (वय ३५, रा. नेहरूनगर, पिंपरी, मूळ रा. बारामती) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भोसरी येथे एम. जी. इंटरप्रायजेस या नावाची फर्म असून ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. तसेच आरोपी याची फ्रन्टीयर रोबोटिक अ‍ॅंड अ‍ॅटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. आरोपीने त्याच्या कंपनीसाठी फिर्यादी यांच्या फर्मकडून हार्डवेअर, मेकॅनिकल वस्तू, तसेच इतर माल अशी एकूण १७ लाख आठ हजार ५०० रुपयांची खरेदी केली. त्यातील सहा लाख ७९ हजार ८२५ रुपये दिले. मात्र उर्वरित १० लाख २८ हजार ६७४ रुपये आरोपीने दिले नाही. दरम्यान आरोपीची फ्रन्टीयर रोबोटिक अ‍ॅंड अ‍ॅटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कुरुळी येथून वासुली येथे शिफ्ट झाली. 

आरोपीने फिर्यादी यांच्याकडून कंपनीसाठी साहित्य खरेदी करून त्यांचे १० लाख २८ हजार ६७४ रुपये तसेच अनुजा अरविंद ताठे (वय ३०, रा. पिंपरीगाव) यांच्याकडून ३२ लाख ४५ हजार ४६४ रुपये, विवेक श्रीराम जकाते (वय ३३, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्याकडून सात लाख एक हजार ४२ रुपये, सुहास संतोष कुलकर्णी (वय ५०, रा. प्राधिकरण, निगडी) यांच्याकडून पाच लाख २२ हजार १२८ रुपये, शिवदास जयप्रकाश सातपुते (वय ३९, रा. आकुर्डी) यांच्याकडून सहा लाख ९८ हजार ५५४ रुपये, ज्ञानेश्वर सुभाष निकम (वय ३३, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्याकडून २० हजार ४८० रुपयांचा माल खरेदी करून त्यांचे पैसे न देता आरोपीने त्यांची एकूण ६२ लाख १६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसbusinessव्यवसाय