अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवार यांच्या भेटीला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

By नारायण बडगुजर | Published: February 5, 2024 05:40 PM2024-02-05T17:40:45+5:302024-02-05T17:42:37+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली.

criminal Asif Darhi meets Ajit Pawar, photo goes viral | अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवार यांच्या भेटीला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवार यांच्या भेटीला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

पिंपरी : पुण्यातील गुंड गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पिंपरी-चिंचवड शहरातील अट्टल गुन्हेगार गेल्याचे समोर आले. या भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने  खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळातून देखील त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरातील आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तो एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. आसिफ दाढी हा तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेशी जोडलेला असल्याचेही समजत आहे.

आसिफ दाढी याच्यावर १९८८ मध्ये मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. १९९६ मध्ये त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. २००२ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. २००४ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झाला. २००७ मध्ये खुनासाठी अपहरण आणि खून असा गुन्हा दाखल झाला. २००९ आणि २०११ मध्ये शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले. २०२१ मध्ये अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला त्याच्या घरातून शस्त्रासह अटक केली होती.


गुंडांच्या भेटीगाठीवरून आरोप-प्रत्यारोप

नुकतीच पुण्यातील गुंड गजा मारणे याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीवरून मोठे वादंग निर्माण झाले. ही भेट चुकीची असल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले होते. तसेच आपण याबाबत काळजी घेऊ, असेही त्यांनी आश्वस्त केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेतली. या भेटीला अवघे काही तास झालेले असतानाच आणखी एका नेत्याच्या भेटीला अट्टल गुन्हेगार गेल्याचे समोर आले. यावरून राजकीय पदाधिाकऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Web Title: criminal Asif Darhi meets Ajit Pawar, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.