शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महाकाली टोळीतील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 7:58 PM

दोन गंभीर गुन्ह्यात फरार असलेला महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगाराच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 

ठळक मुद्देचार अग्निशस्त्रासह जिवंत काडतुसे हस्तगत : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त 

हिंजवडी : पिंपरी - चिंचवड शहरासह पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल पंधरा गुन्हे दाखल असलेला तसेच हडपसर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यामधील दोन गंभीर गुन्ह्यात फरार असलेला महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगाराच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सागर कुमार इंद्रा (वय २५, रा. यलवाडी, देहूगाव) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून चार अग्निशस्त्रासह जिवंत काडतुसे, दुचाकी असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रा हा महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच हडपसरसह हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात तो फरार होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दीत गस्त घालत असताना फरार आरोपी हा घोटावडे गावाकडून हिंजवडीच्या दिशेने दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या सूचनेनुसार तत्काळ पोलिसांची दोन पथके तयार करून माण - गवारेवाडी रस्ता तसेच आयटीपार्क फेज तीनकडे जाणाºया रस्त्यावर साध्या वेषात तैनात करण्यात आली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी दुचाकीवरून फेज तीनकडे जात असल्याचे पोलीस हवालदार आतिक शेख यांच्या लक्षात येताच पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता जवळील सॅकमध्ये दोन गावठी पिस्टल आणि दोन राउंड मिळून आले. तसेच सोमवारी (दि. २३) तो रहात असलेल्या यलवाडी देहू येथील घराची झडती घेतली असता आणखी दोन पिस्टल दोन राउंड जप्त करण्यात आले. असे एकूण चार पिस्टल, चार राउंड, एक दुचाकी असा एकूण एक लाख ५० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अजय जोगदंड निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे अनिरुद्ध गिजे, मीनिनाथ वरुडे, महेश वायबसे, पोलीस हवालदार किरण पवार, आतिक शेख, अमर राणे, नितीन पराळे, हनुमंत कुंभार, विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, झनक गुमलाडू, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढविण्यात आली आहे. मागील काही दिवसात अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, तसेच चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. अट्टल गुन्हेगारांवर जरब बसवण्यात यश आले आहे. - यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस