पिंपरी : चिंचवड परिसरातील गणेशोत्सव मिरवणूक सुरुवात झाली आहे. चापेकर चौकात गणेश भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. आत्तापर्यंत केवळ १० गणेश मंडळांनी मिरवणूक द्वारे विसर्जन केले. पिंपरी चिंचवड मध्ये घरगुती गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या जल्लोषात, उत्साह पूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..., अशा घोषणा देत ''पुढच्या वर्षी लवकर...'' या अशी आर्जव करीत लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला.
चिंचवड परिसरातील मोरया गोसावी घाट, थेरगाव बिर्ला हॉस्पिटल पूल घाट, रावेत घाट येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक तयारी सुरु
चिंचवड मध्ये पहिला गणपती दुपारी सव्वा तीन वाजता वेतालनगर येथील शिवतेज मित्र मंडळ गणपती चापेकर चौकात आला. तिथे महापालिका प्रशासनाने स्वागत केले. सायंकाळी सात पर्यंत १० गणेश मंडळे चौकातून पुढे सरकली. महापालिका प्रशासनाने वतीने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ यांनी स्वागत केले. चौकातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अनिरुद्ध बापू संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. घाटावर बेरीकेट-पवना घाटावर महापालिकेच्या वतीने आरोग्य सेवक, वैद्यकीय सेवक आणि अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यात आली होती. तसेच कृत्रिम हौदही तयार करण्यात आला होता. नदीत गणरायाचे विसर्जन करण्याऐवजी हौदात विसर्जन करावे, असे आवाहन सामाजिक संस्था च्या वतीने करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. पावसाने उघडीत दिल्याने गणेश भक्तांचा उत्साह अपूर्व असल्याचे दिसून आले. नदीचे पाणी वाढल्याने घाटावर बॅरिकेट लावले होते. उत्साह वाढला-दुपारनंतर गणेश भक्त उत्साह वाढला. पवना नदी घाटावर घरगुती गणरायाचे विसर्जन केले जात होते. सायंकाळी सहा नंतर मिरवणूक काढण्याची तयारी सुरू झाली. देखावे सजविण्याची लगबग सुरू होती. चिंचवड परिसरातील गणेशोत्सव मिरवणूक सुरुवात झाली आहे. चापेकर चौकात गणेश भक्ताची गर्दी होऊ लागली आहे.