मोशी : पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. या संकल्पनेत पर्यावरण संवर्धनासाठी सायकल ट्रॅक बनविण्यास प्राधान्य आहे. प्रत्यक्षात सायकल ट्रॅक तयार न झाल्याने सायकलपटू नाराजी व्यक्त करत आहेत.सायकल ट्रॅककडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील घरकुल चौक, कुदळवाडी चौक, शाहूनगर, निगडी-दापोडी मार्गासह अन्य परिसरात असलेले सायकल ट्रॅक गायब झाले आहेत. सायकल चालवायची तरी कशी, असा प्रश्न सायकलपटूंना पडला आहे. काही ठिकाणी विविध कामांसाठी सायकल ट्रॅकचे खोदकाम केले आहे, तर काही ठिकाणी पादचारी मार्गावरच सायकल ट्रॅकचे फलक लावले आहेत. हे फलक आता नावापुरते उरले आहेत. त्या सायकल ट्रॅकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे नेमका हा सायकल ट्रॅक आहे, की पादचारी मार्ग याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. दरम्यान, दररोज सायकलिंग करणाºयांना वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे सायकल चालविणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर पडावे लागत आहे. शहरात सायकल ट्रॅक नसल्याने सायकलपटूंचा हिरमोड होत आहे. शहरात सायकल चालवण्यास स्वतंत्र ट्रॅक (रस्ता) देखील उपलब्ध नसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मार्गावरील सायकल ट्रॅक हद्दपार होऊ लागले आहेत. शहरात रस्त्याच्या बाजूला असलेला सायकल ट्रॅक कोणत्या ना कोणत्या कारणाने गायब होत आहेत. सायकल ट्रॅकवर अतिक्रमण, काही ठिकाणी महापालिकेने रस्त्यासाठी ट्रॅकच उखडून टाकले आहेत. त्यामुळे शहरात सायकल ट्रॅक केवळ कागदोपत्री दाखवून महापालिकेने अनेक योजनांमध्ये शासनाचे अनुदान लाटले. प्रत्यक्षात कागदावरचे ट्रॅक रस्त्यावर उतरले नाहीत. पुणे महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पांतर्गत सायकल भाड्याने देण्याचा उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमालाअतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. तसा उपक्रम पालिका प्रशासनाने राबवावा, अशी मागणी विश्वास काशीद यांनी केली.‘ट्रिंग-ट्रिंग डे’चा सोयीस्कर विसरशहरात सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातून सायकल हद्दपार झाली. मात्र, पुन्हा सायकलिंगचा नवा ‘ट्रेंड’ येऊ लागला आहे. ‘फिटनेस’करिता सायकलिंगचा व्यायाम लोकांमध्ये रुजू लागला आहे. आयटी क्षेत्रात जॉब करणाºया कुटुंबीय सुटीच्या निमित्ताने सायकलिंगवर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. काही जण पुणे-लोणावळा, कात्रज घाट, ताम्हिणी घाट अशा अनेक ठिकाणी सायकल चालवताना दिसतात.एकीकडे आरोग्यासाठी लाभदायी म्हणून सायकलींचा वापर वाढत असताना शहरात सायकल ट्रॅकच उपलब्ध नाहीत. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी शहरातील प्रदूषण कमी व्हावे, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, लोकांनी सायकलचा वापर अधिकाधिक वाढवावा, याकरिता महापालिकेने ‘ट्रिंग-ट्रिंग डे’ महिन्यातील एका रविवारी शहराच्या विविध भागांत घेतला जात होता. परंतु, त्यांची बदली झाल्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे, विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात हा उपक्रम बंद पडला असल्याचे दिसूनयेत आहे.सायकल ट्रॅक उरलेफक्त कागदावरचपिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मार्गावरील सायकल ट्रॅक हद्दपार होऊ लागले आहेत. शहरात रस्त्याच्या बाजूला असलेला सायकल ट्रॅक कोणत्या ना कोणत्या कारणाने गायब होत आहे. सायकल ट्रॅकवर अतिक्रमण, काही ठिकाणी महापालिकेने रस्त्यासाठी ट्रॅकच उखडून टाकले आहेत. त्यामुळे शहरात सायकल ट्रॅक केवळ कागदोपत्री दाखवून महापालिकेने अनेक योजनांमध्ये अनुदान लाटले आहे, अशी तक्रार होत आहे. ट्रॅक रस्त्यावर उतरले नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
सायकल ट्रॅक कागदावरच, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 6:07 AM