पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सुब्रतो मुखर्जी चषक १७ वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत दिघीच्या आर्मी पब्लिक स्कूलने देहूरोडच्या आर्मी पब्लिक स्कूलवर १-० असा विजय मिळवीत अजिंक्यपद पटकाविले. या संघाने १४ वर्षांखालील गटातही विजेतेपद पटकाविले होते.महापालिकेच्या मासूळकर कॉलनीतील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. रविवारी लख्ख सूर्यप्रकाशात उपांत्य आणि अंतिम सामने खेळले गेले. चुरशीच्या अंतिम सामन्यात दिघीच्या आर्मी पब्लिक स्कूलने देहूरोडच्या आर्मी स्कूलवर सरशी साधली. गोल नोंदविण्यासाठी दोन्ही संघांकडून प्रयत्न झाले. मात्र, दोन्ही संघांचा बचाव भक्कम असल्याने उभय संघांना यश मिळत नव्हते. अखेर दिघीच्या रोहित भुसेने ही कोंडी फोडत गोल नोंदविला. त्याचा हा गोलच विजयी ठरला.तिसºया क्रमांकासाठीच्या सामन्यात चिंचवडच्या प्रतिभा ज्युनियर कॉलेजने आकुर्डीच्या सेंट उर्सुला हायस्कूलवर टायब्रेकरमध्ये सरशी साधली. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला होता. त्यात प्रतिभा कॉलेजकडून निलीम पलांडे, पार्थ नाईकरे, निर्मल सोनार, हाफिज शेख यांनी गोल केले. उर्सुला हायस्कूलकडून अक्षय देशमुख आणि जसबीन जयेश यांनाच गोल करता आले.
दिघीचे आर्मी स्कूल अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:22 AM