पिंपरी : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भोसरीतील दोघांची आॅनलाइन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. एकाला हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून २० हजाराला, तर दुसºयास एटीएम कार्डसंबंधी गोपनीय माहिती घेऊन १५ हजारांना गंडा घातला आहे. पोलिसांकडे २९ जुलैला फिर्याद दाखल झाली आहे.भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास महांबरे यांना राकेश शर्मा व अन्य दोन जणांनी मोबाइलवर संपर्क साधून हॉलिडे पॅकेजची माहिती दिली. आॅनलाइन २० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने आॅनलाइन रक्कम भरली. मात्र कसलेही हॉलिडे पॅकेज त्यांना मिळाले नाही. फसवणूक झाली म्हणून त्यांनी राकेश वर्मा व अन्य दोन अज्ञात आरोपींविरोधात फिर्याद दिली.दुसºया घटनेत फिर्यादी महेंद्र पाल यांना २९ जुलैला मोबाइलवरून संपर्क साधून अज्ञात भामट्यांनी एटीएम कार्डसंबंधी माहिती सांगण्यास भाग पाडले. बँकेचा अधिकारीबोलत असल्याचे सांगून आपले एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहेअशी भीती दाखवून एटीएम कार्डची माहिती घेतली. फिर्यादीच्या खात्यातून परस्पर १५ हजार रुपये दुसºया खात्यात वर्ग झाले.
दोघांची आॅनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:30 AM